QuestionsCategory: General KnowledgeKasa abhyas karava?
rohan asked 7 years ago
45 Answers
Best Answer
siddiqui143 answered 7 years ago
१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे ट्रँफिक्च्य आवाजापासुन दुर असायला हवे. टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके नसावीत. २. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले अस्तात आणि सर्वत्र शांतता असते. ३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १ तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो. तेव्हा त्यांची स्मरण्शक्त्ती कमी होते. आणि तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५ मीनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन लक्षात यायला मदत होते. ४. छोट्या मंध्यतराप्रमाणे मुलांनी काही काळ खेळण्यात, मीत्रांशी गप्पा मारण्यात, टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि अभ्यास करताना उस्ताह येतो. ५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही. ६. एखादा धडा वाचताना तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील मुद्याची शीर्षके, धड्याची प्रस्तावना आणि सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट ओळख होते. ७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरे आधीक चांगल्या तर्हेने लीहु शकता. आणि तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लीखाणामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो. शिकण्याची क्षमता ही माणसाला मीळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.
976616477 answered 7 years ago
It's our mood.
Sumit answered 7 years ago
ज्या त्या विषयाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावयाचा असतो.
pratikdange answered 7 years ago
with concentration....
sachin_nalbhe answered 7 years ago
Abhyas kasa karava he self depend ast
dbshaikh answered 6 years ago
Time table tayar Karun abhyas Kara.
nikhil answered 6 years ago
Please check on google and youtube channel. There are many idea of how to do study
Abdul Shafi answered 6 years ago

कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते.

Sandip answered 6 years ago
while studying be focused on syllabus.....
Don't try to get too much knowledge,be specific to syllabus.
And don't work hard. Work Smartly Hard.
good luck
pavanbansode answered 6 years ago
Kahi wel meditation karun Mag study kara
ashishkhalode answered 6 years ago
he tumhi swahta decide kara 
sandeep answered 6 years ago
keep practicing ... Improve day to day .. increase ur knowledge .. update yourself
pratha121ha answered 6 years ago
Only practice  previous  question  papers 
nileshpatil1834 answered 6 years ago
हे तुम्ही स्वतः ठरवून केले पाहिजे
Aks Thakare answered 6 years ago
Tumhi ek Vel Tharva ki tya Subject Sathi Ahe ani Tya velet te Purn Karne Per Subject Sathi Vel tharvun Ghya
msdeore777 answered 6 years ago
Watch strategy on youtube of successful candidates and follow some selected style of study of them
kadam123 answered 6 years ago
विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. सहामाही परीक्षा होऊन निकालही लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली प्रगती समजली असेल. मात्र सेमिस्टर सिस्टीम सोडून बोर्डाच्या वार्षिक परीक्षेवर भविष्य अवलंबून असणा-या विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास कसा करावा ही कला अवगत करून घेतली पाहिजे. यातच विद्यार्थ्यांचे हित अवलंबून असते. दिवाळीचा आनंद आणि फराळाचा आस्वाद लुटता लुटता अभ्यासाचासुद्धा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला पाहिजे. केवळ दिवाळीनिमित्ताने सुट्टी मिळाली म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवू नये. ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत शहरातील खासगी क्लासेसला मुलांना पाठवितात. कारण ‘शिक्षण’ हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेला बसलेल्या जीवलग विद्यार्थी मित्रांनी अभ्यास कसा करावा हे जाणून घ्यायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात यशवंत होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर वर्षभर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास केला पाहिजे. यासाठी उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासून अभ्यासाला लागणे आवश्यक आहे. मी खूप हुशार आहे असे म्हणून यश प्राप्त होत नाही, तर त्यासाठी रोज अभ्यास करावा लागतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. आजचे युग हे वैज्ञानिक व स्पध्रेचे आहे. स्पध्रेत ठिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा आशय समजून घेऊन उत्तम प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे. आता, अभ्यास कसा करावा, हे आपण समजून घेऊ. यासाठी प्रथम विद्यार्थ्यांनी अभ्यासाला अशी पोषक जागा निवडणे आवश्यक आहे. काही ठिकाणी अभ्यास करायला जागा नसल्यामुळे रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करणारे विद्यार्थी दिसतात. तरी पण ब-यापैकी मार्क मिळवतात. परंतु अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र जागा हवी. एका दिवसाचे चोवीस तास असले तरी विद्यार्थी शाळेत किती तास असतो. येण्या-जाण्यासाठी किती वेळ लागतो, खेळासाठी व इतर गोष्टींसाठी किती वेळ देतो, किती तास झोपतो, असे वीस तास गेले तरी किमान दररोज चार तास अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचा खरा ‘आत्मा’ वाचन असते. पुस्तकाचे वाचन करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अवांतर पुस्तकेसुद्धा वाचली पाहिजेत. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी मोठय़ाने प्रकट वाचन करावे. वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू अथवा लिहू शकतो. असे वेळापत्रक तयार केल्याने दररोज अभ्यासाची उजळणी होते. अभ्यासाची चांगल्या मित्रांबरोबर चर्चा केल्याने त्यात स्वत:चे हित होते. अभ्यासाबरोबर नियमित लिखाण करणे गरजेचे आहे. यामुळे बोटावरती जास्त ताण पडत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या आवडीचा योग्य आहार खाणे आवश्यक आहे. अकस्मात आहारामध्ये बदल करू नये. आपण कितीही सुज्ञान झालो तरी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. त्यांचा आदर राखावा. केवळ पास होण्यापुरते ज्ञान नसावे, तर ते ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा दुस-यांना वापर झाला पाहिजे. येणा-या संकटांना सामोरे गेले पाहिजे, असा आत्मविश्वास स्वत:च निर्माण केला पाहिजे. वात्रट मुलांच्या नादी न लागता त्यांच्यापासून चार हात दूर राहावे. स्वत:ला स्वत:ची शिस्त लावून घेतली पाहिजे. विचार मोठे ठेवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढून आत्मविश्वास निर्माण होतो. याचा परिणाम विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करून यशवंत होऊ शकतात. मागील पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हातात असणा-या पुस्तकाची जागा मोबाईल सम्राटाने घेतली आणि त्यापासून हळूहळू पुस्तकांच्या वाचनाकडे दुर्लक्ष होऊन त्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपने घेतली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही विद्यार्थी मनोरुग्ण झालेले आढळले आहेत. इतकी पकड मोबाईलने केली आहे. सध्या तर तीन महिन्यांसाठी ४५० रुपयांमध्ये प्रत्येक दिवशी एक जीबी डेटा मोफत व कितीही बोलता येते. कदाचित ही सेवा स्वस्त वाटत असली तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. हे मुलांनी टाळले पाहिजे. नंतर, आई-वडिलांना दोष देण्यापेक्षा याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजनांचा आदर केला ते विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यासाच्या मागे लागून आज आरामदायी जीवन जगत आहेत. तर ज्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली ते आज व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळासाठी शिक्षण खूप उपयोगी आहे. थोडक्यात, विविध विषयांचे ज्ञान, झोपणे, मस्ती करणे, खेळणे, वृत्तपत्राचे वाचन, टी.व्ही. बघणे, अवांतर पुस्तकांचे वाचन, शाळेत येण्या-जाण्याला लागणारा वेळ आणि शाळेची वेळ अशा बाबींचा अंतर्भाव करून दिवसाचे नियोजन केल्यास विद्यार्थी तणावमुक्त होऊन परीक्षेसाठी सज्ज राहू शकले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र जाणून घेतले पाहिजे. तरच तो विद्यार्थी यशवंत होईल.
pashyadm answered 6 years ago
adhi exam che privious questionpaper attempt karun agha tumachi leveltumhala samjel mag jya vishayat kamjor ahat tya var jast har dya  
vaibha answered 6 years ago
the things which prevent you from studying skip that things like poisen you will find no distraction
rajashri answered 6 years ago
Make your study timetable and do not use mobile while studying.
Pk767 answered 6 years ago
Enroll in an in person course. There are in person classes that you can take that are given by the Princeton Review for the ACT, for example.[1] These classes are great because some students benefit from the sense of accountability that you get from a traditional class setting. These classes can vary in length, but for the Princeton Review course, it lasts 6 sessions. To enroll, you go online and find a website for the course you want to take, enter where you live, and the dates you are interested in taking the class to find a class near you.
  • The Princeton Review course gives 4 practice tests so that you can measure your progress and target your problem areas. Most other test prep courses will offer something similar for you to chart your progress.
  • These classes tend to be expensive but will often include the cost of the study materials that you will be needing.
  • Do the homework associated with these courses in order to score the best you can.
  • If you live in a rural area, you may need to commute to a city to take the tests.
Rambhau answered 6 years ago
Make your study timetable and do not use mobile while studying.
Quorans answered 6 years ago
as elders says " MAN LAVUN ABHYAS KARAVA" it means that study with heart and enthusiasm and with interest in it
Ramkrushna Rajole answered 6 years ago
  • Step 1: Find out your learning style. ...
  • Step 2: Set realistic study goals. ...
  • Step 3: Make study time a part of your daily routine. ...
  • Step 4: Structure your study time. ...
  • Step 5: Create your own study zone. ...
  • Step 6: Take notes depending on your learning style. ...
  • Step 7: Review your notes regularly.
Aslam answered 6 years ago
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा व त्यानुसार अभ्यास करा 
somnath_kamade answered 6 years ago
Plan your all days shedual
Sameer1 answered 6 years ago
रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.
pasha answered 6 years ago
Set realistic study goals.
hemantthopate answered 6 years ago
Free mind ne abhyas karava
Kiran Patil answered 6 years ago
Tumhi sandip maheshvari yanche video paha you tube la
laxman_pawde answered 6 years ago
Share on Facebook कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात. मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील. स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते. योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे. १. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे. २. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे. ३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते. ४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो. ५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही. ६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नियंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नये किंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये. ७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे. मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत : अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते. आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल. इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे. ई. घाणेरड्या व अश्‍लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे. उ. लहान लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल. ८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त हात जाते. ९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो. १०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळे. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही. ११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणर‍हित व संघर्षरहित असते. - महाएज्युटेकनेट टीम प्रस्तुत लेख "विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य" या रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.
KMP answered 6 years ago
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=%23&ved=2ahUKEwiGs621vNPfAhXIBIgKHbDHBFIQwqsBMAB6BAgMEAU&usg=AOvVaw0VTJzWxrN8ZFOD4xbU2nov
vip answered 6 years ago
sakali v ratri abhyas krava
Akshay Shinde answered 6 years ago
Self study
Kiran Patil answered 6 years ago
Focus on your dreems study hard
Ujwal Shinde answered 6 years ago
study easy way that you understand 
Siddhantgupta2205 answered 6 years ago
Roz daily morning madhe 5 to 7 kelel study khup important aste 
Sumit answered 6 years ago
तुम्हाला जेव्हा अभ्यास करावासा वाटेल तेव्हा तुम्ही करा याचा अर्थ असा नाही कि तुम्ही 4-5 दिवसातून एकदा तुम्ही एक दिवसाचे वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास केला तर चालेल.
rahulthopate89 answered 6 years ago
KHUP KARAVA
Dhanju43 answered 6 years ago
Www.pioneer.in
Shekhar Patil answered 6 years ago
focus पद्धतीने अभ्यास कराव... focus on study
dnyane123485 answered 6 years ago
Concentration karun
Yogesh ingle answered 6 years ago
first make a timetable then start study
ranalkar73 answered 6 years ago
It's only depend on you. 
Shivray08 answered 6 years ago
Focus on read