नमस्कार प्रिय वाचकांनो,
सध्या बोगस नोकरी जाहिरातीचा सुळसुळाट चालू आहे. होय सुळसुळाटच म्हणावं लागेल, कारण काही वेबसाईटवर सामान्य जनतेची दिशाभूल होईल अश्या नोकरी विषयक जाहिराती सर्रास प्रसिद्ध केल्या जात आहेत त्यामुळे योग्य खात्री करूनच अर्ज करावा. माझी नोकरी वाचकांची फसवणूक होऊ नये या करिता आम्ही नोकरीच्या जाहिरातीची पूर्णपणे शहनिशा करून झाल्या नंतरच ती जाहिरात आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करीत आलो आहोत आणि यापुढे ही करणार. यामुळे एखादी जाहिरात उशिरा प्रसिद्ध होते. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. एखाद्या जाहिरातीबद्दल शंका असल्यास कृपया आम्हाला ‘प्रतिक्रिया‘ मधून जरूर कळवा. आणखी एक महत्त्वाचे; ज्या नोकरींच्या जाहिरातीचा महाराष्ट्रातील वाचकांना खरोखरच उपयोग होणार असेल अश्याच जाहिराती आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातात. उदाहरणार्थ, एखादी जाहिरात फक्त 1-2 जागांसाठी असेल तसेच एखाद्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नसल्यास ती जाहिरात आम्ही प्रसिद्ध करीत नाहीत.
या कार्यात आपले सहकार्य मिळेल अशी आशा करतो.
आपला;
संस्थापक/संचालक – माझी नोकरी