Rest in Peace !!
_/\_ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना माझी नोकरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !! _/\_
♦ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय ♦
पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म : 15 ऑक्टोबर 1931 (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
निधन : 27 जुलै 2015 (शिलाँग) ( वयाच्या 84 व्या वर्षी )
कलाम यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ 25 जुलै, इ.स. 2002 ते 25 जुलै, इ.स. 2007 होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
कलाम हे 25 जुलै 2002 रोजी भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले. प्रथमच प्रत्यक्ष राजकारणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेली व्यक्ती राष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली.
सामान्य परिस्थितीपासून प्रारंभ करुन या पदापर्यंत पोहचलेल्या, जनतेला आपल्यातलेच एक वाटणार्या कलाम यांचे चरित्र कोणालाही स्फूर्तीदायक ठरेल, असेच आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात चिंचोके व वर्तमानपत्रे विकून त्यांनी आयुष्याचा पाया रचला. तेव्हापासून त्यांनी कष्टाची साथ कधीच सोडली नाही.
रामेश्वरमसारख्या ठिकाणी जातीय विषमतेचे अनुभव येणे साहजिकच होते, त्याच वेळी माणुसकी व समंजसपणाचेही धडे त्यांना मिळाले. हे संस्कार ही त्यांची आयुष्यभराची शिदोरी ठरली. प्रखर बुद्धिमत्तेबरोबरच, संकट व तणावांशी सामना करण्याचं धैर्य यांच्या जोरावर त्यांनी मोठा पल्ला गाठला.